भाजपाच्या दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा सहभाग

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दिल्ली येथील भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीयमंत्री नारायण राणे,पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आ.नितेश राणे,प्रमोद जठार,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील,संघटन मंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित आहेत. या दोन दिवसीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी,राष्टीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासहित देशभरातील मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,राज्याचे मंत्री, खासदार आमदार,जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील पदाधिकारी असे एकूण 10800 प्रतिनिधी उपस्थित आहेत. आज पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी,राष्ट्रीय अध्यक्ष मा जे पी नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाचा शुभारंभ करण्यात आला.

error: Content is protected !!