वैभववाडी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांनी वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे,अरुळे,कुर्ली,नावळे,गडमठ, वेंगसर,हेत,उपळे या टॉवरसाठी पाठपुरावा करून मंजूर करून घेतले.व त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे कुंभवडे गाव हे मोबाईल नेटवर्क सुविधेपासून वंचित होते.त्यासाठी या गावातील विद्यार्थांसाठी व शासकिय कार्यालयासाठी इंटरनेट उपलब्ध होत नव्हता. या सर्व होणाऱ्या गैरसोई लक्षात घेऊन या गावचे सुपुत्र शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे व ग्रामपंचायत कुंभवडे यांनी वेळोवेळी खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळेच या टॉवरचे काम लवकरात लवकर झाले. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी कुंभवडे येथे मोबाईल टॉवरच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके,उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे,कुंभवडे सरपंच शिल्पा सावंत, माजी सभापती रमेश तावडे, सोसायटीचे चेअरमन बापू चव्हाण, जमीन मालक प्रभाकर दळवी,उपसरपंच विनोद कदम, मुंबई मंडळ अध्यक्ष बजरंग तावडे,प्रभाकर तावडे, विठोजी पाटील,यशवंत गवाणकर,शाखा प्रमुख दीपक चव्हाण,महिला शाखाप्रमुख सुरेखा चव्हाण,दादा चाळके,माजी सरपंच मिलिंद गुरव,जनार्दन शिंदे, परशुराम आमकर, सुरेश सावंत, घनश्याम चव्हाण, रमेश पाटील आदि उपस्थित होते.













