सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पत्रकारितेत नवनवीन बदल घडत आहेत. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून जिल्ह्यातील पत्रकारांनी आपली पत्रकारिता “हायटेक” करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी आज येथे केले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेले बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन दर्जेदार आहे. त्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील पत्रकारांनी घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि जिल्हा पत्रकार भवनाच्या उद्घाटना निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. राणे बोलत होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, पद्मश्री परशुराम गंगावणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, जिल्हाधिकारी के, मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव देवयानी वरसकर, खजिनदार संतोष सावंत, कार्यकारणी सदस्य हरिश्चंद्र पवार, माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, डिजिटल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमोल टेबकर, पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर आदिसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.