मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख आग्रे यांनी केली नियुक्ती
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुखपदी खारेपाटण येथील मंगेश गुरव यांची निवड करण्यात आली आहे.शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी गुरव यांची उपतालुकाप्रमुखपदी निवड केली आहे.निवडीबाबत चे पत्र शिवसेना नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते कणकवली येथील संपर्क कार्यालायत मंगेश गुरव यांना देण्यात आले.अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत मंगेश गुरव यांनी खारेपाटण ग्रामपंचायत शिंदे गटाकडे आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. प्रचारप्रमुख म्हणून यंत्रणा हलवत खारेपाटण सरपंचपद शिंदे गटाकडे खेचून आणले होते. गुरव यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर उपतालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, मालवण तालुकाप्रमुख विश्वास गावकर, महेश राणे, कुडाळ तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, बबन शिंदे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर आदी उपस्थित होते