कुडाळ (प्रतिनिधी) : नेरूर येथील श्री क्षेत्र कलेश्वराचा महाशिवरात्र व रथोत्सव मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा झाला. ३२ वाड्यांनी व्यापलेला नेरूर गाव आणि नेरूर गावात कलेला मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. या नेरूर गावात गायन, भजन, कीर्तन, दशावतार अशा प्रकारचे अनेक कलाकार या गावात जन्मास आले. कलेचा ईश्वर म्हणून ख्याती असलेल्या श्री. क्षेत्र कलेश्वर मंदिरात महाशिवरात्र रथोत्सवा दिवशी पहाटे ३ पासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. पहाटे ५ वाजता मानकरी व भडजींच्या हस्ते कलेश्वर महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. पूजा संपन्न झाल्यानंतर लगेचच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर सकाळी १० वाजता गाण्याचा कार्यक्रम झाला. दुपारी ४ वाजता कीर्तनकार ह. भ.प. भाटवडेकर बुवा यांचे कीर्तन सादर झाले. रात्री १२ वाजता दशावतारी गणपती दर्शनासह श्रींची रथापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. रात्री १२:३० वाजता दशावतारी नाटकाचा उर्वरित भाग कै.बाबी कलिंगन नाट्य मंडळ नेरूर यांनी सादर केला. गेली दोन वर्षे कलेश्वराचा वार्षिक महाशिवरात्रोत्सव कोरोना कालावधीत शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार साजरा झाला होता. पण यावर्षी, कोविड मुक्त महाशिवरात्र साजरी करण्यात आली. यावर्षी श्री.क्षेत्र कलेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी दीड ते दोन लाख भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने राजकीय नेत्यांनी व सेलिब्रिटींनी सुद्धा कलेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. तसेच यावर्षी देवस्थान स्थानिक सल्लागार उपस्थिती नेरूर व प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबत सर्व भक्त गणांनी आनंद व्यक्त केला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आपल्या या ठिकाणी प्रतिक्रिया मांडल्या. की, यावर्षी सर्वांनी विशेष मेहनत घेत हा कार्यक्रम यशस्वी संपन्न केले असे सांगितले. तसेच, कुठल्या प्रकारचा त्रास भाविक भक्तगणांना झाला नसल्याचे देखील सांगितले, सर्व यंत्रणांनी चांगली सेवा दिल्याचे अनेक भाविकांनी व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी यावेळी सांगितले. वाहतूक सेवा असेल विद्युत पुरवठा कायमस्वरूपी सुरू होता. यावर्षी ट्रॅफिक वाहतूक ची समस्या दूर झालेली होती. तसेच आरोग्याच्या दृष्टीने यावर्षी प्राथमिक केंद्र वालावल यांच्यावतीने रुग्णांना मोफत सेवा दिली गेली. महाशिवरा उत्सवाच्या पहिले चार दिवस आधी श्री.क्षेत्र कलेश्वर मंदिरात रोज सकाळी धार्मिक विधी, महाप्रसाद, दशावतारी नाटके, पालखीतून श्रींची मिरवणूक गायक श्री. दिनू मेस्त्री आणि सहकारी यांचे गायन सादरीकरण आणि कीर्तनकार बुवा श्री भाटवडेकर बुवा यांचे कीर्तन अशा प्रकारचे कार्यक्रम देखील करण्यात आले. याप्रसंगी विशेष सहकार्य लाभले ते कुडाळ तहसीलदार माननीय अमोलजी पाठक, कुडाळ पोलीस स्टेशन कुडाळ चे सर्व अधिकारी, कर्मचारी होमगार्ड, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग वालावल आणि देवस्थान कमिटी नेरूर या सर्वांनी मिळून यावर्षी झालेल्या महाशिवरात्र व रथोत्सवास सर्व भाविक भक्तांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचं काम यावेळी करण्यात आलं. याप्रसंगी देवस्थान आणि स्थानिक सल्लागार उप समिती चे अध्यक्ष सर्व कमिटीचे सदस्य मानकरी बंधू तसेच नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच माजी सरपंच, या सर्वांनी मिळून प्रशासनाचे, व्यापारांचे आणि भाविक भक्तगणांचे मनापासून आभार मानले आहेत.