संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीचे औचित्य
कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक २३/२/२०२४ रोजी वार. शुक्रवार या रोजी दीविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी वर्ग व शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहीम दिविजा वृद्धाश्रम असलदे ते कोळोशी बाजारपेठ पर्यंत जाणारा मार्ग परिसरात साफ सफाई केली तसेच स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे, व, माझा गाव स्वच्छ गाव. असे घोषणा देत समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांचा मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम कार्यक्रम करण्यात आला. समाजातील लोकांना स्वच्छतेचे महत्व कळावे या उद्देशाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी व शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ यांच्या सहकार्यामुळे परिसरातील प्लॅस्टिक कचरा व प्लॅस्टिक बॉटल उचलून या कचऱ्याची योग्यत्या प्रकारे विल्हेवाट लावली गेली. या कार्यक्रमासाठी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी वर्ग तसेच शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.













