आचरा (प्रतिनिधी) : “ज्या मातीत आपण जन्मलो, ज्या देशाचे मीठ खाल्ले, त्या देशाचे कर्ज फेडल्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही.” असा विचार घेणारे देशभक्त क्रांतीकारक, ओजस्वी वक्ता, प्रभावशाली साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सरपंच नम्रता महाकांळ-पालकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, रवींद्र घागरे, मनोज हडकर, दिलीप कावले, पोलीस पाटील दिनेश पाताडे, दिगंबर जाधव, संतोष अपराज, विश्राम माळगावकर, समीर अपराज, संजय लोके आदी उपस्थित होते.













