ठाकर समाजावर अन्याय करणाऱ्या सहआयुक्त पावरा यांची लवकरच होणार उचलबांगडी

आमदार नितेश राणे यांनी आदिवासी विकासमंत्री गावित यांची भेट घेत वेधले लक्ष

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची भेट घेऊन ठाकर समाजाच्या विविध मागण्यांविषयी चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांवर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांकडून वारंवार अन्याय होत होता. विशेष करून ठाणे येथील डी.जी. पावरा, उपायुक्त तथा सहआयुक्त, जात पडताळणी समिती, ठाणे यांकडून पूर्वग्रह दूषित निर्णय दिले जात होते. त्यामुळे सिंधुदुर्गातील ठाकर समाजातील विद्यार्थी व कर्मचारी यांवर अवैध ठरून उच्च न्यायालयात धाव घेण्याची वेळ येत होती. उच्च न्यायालयाकडून मात्र तात्काळ सकारात्मक निर्णय होत होते. या सर्वात ठाकर समाज बांधवांची प्रचंड आर्थिक हानी होत होती. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी आज दिनांक 21 फेब्रुवारी, 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री. गावित यांची मंत्रालयात भेट घेतली. भेटीदरम्यान अन्यायकारक उपायुक्त श्री. पावरा यांची तात्काळ बदली करण्याचे आश्वासन श्री. गावित यांनी राणे यांना दिले तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर बांधवांवर कोणताही अन्यायकारक निर्णय लादला जाणार नाही याची हमी दिली. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच मुंबई स्थित सर्व ठाकर समाज बांधवांनी नितेश राणे यांचे आभार मानले आहेत, तसेच आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!