राज्यातील 1 हजार 300 अभियंता उद्या होणार शासकीय सेवेत दाखल

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देणार नियुक्तीपत्र

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राबविण्यात आली होती राज्यस्तरीय भरतीप्रक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राबविण्यात आलेल्या राज्यस्तरीय कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता पदावरील पात्र ठरलेल्या एकूण 1 हजार 300 उमेदवारांना उद्या 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते समारंभपूर्वक नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. तब्बल तेराशे अभियंता एकाचवेळी शासकीय सेवेत दाखल होत असल्यामुळे साहजिकच पिडब्ल्यूडी खात्याचा कार्यभार अधिक गतिक्षम होणार आहे. उद्या 7 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे सकाळी 11 वाजता ही नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.सामान्य प्रशासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे, पिडब्ल्यूडी च्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या नियुक्तीपत्र वाटप सोहळ्याला पिडब्ल्यूडी चे सचिव सदाशिव साळुंखे, संजय दशपुते,मुख्य वास्तूशास्त्रज्ञ चेतन आक्रे, पिडब्ल्यूडी मुंबई विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे आदी उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!