पोक्सोसह विनयभंगाच्या गुन्ह्यात अजय महादेव पावसकर याला 3 वर्षे सश्रम कारावास

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : अल्पवयीन दोन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याच्या खटल्यात आरोपी अजय महादेव पावसकर (रा. पावशी, बौद्धवाडी, ता. कुडाळ) याला 3 वर्षे सश्रम कारावासासह 500 रु. दंड व दंड न भरल्यास 7 दिवस साधी कैद अशी शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश डॉ. सानिका जोशी यांनी ठोठावली. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी या खटल्यात आरोपीचा गुन्हा शाबीत करण्यासाठी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी अजय पावसकर याने 12 वर्षीय दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचा विनयभंग केला होता.पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार अजयविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा2 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता घडला होता. आरोपीला त्याच दिवशी रात्री अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास महिला एपीआय यादव यांनी केला होता. आरोपी अजय हा गेली 2 वर्षे न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, साक्षीदार असलेली तिची मैत्रीण तसेच शिक्षकांची साक्ष महत्वाची ठरली.

error: Content is protected !!