खांबाळे सरपंच प्राजक्ता कदम यांच्या हस्ते भूमिपूजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे मोहितेवाडी खालचीवाडी या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली होती तेथील ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता पंचायत समिती सदस्य, खांबाळे गावचे सुपुत्र व वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी विनायक राऊत साहेब यांच्याकडे हा रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून डोंगरी विकास निधी मधून 4 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या रस्त्याचे भूमिपूजन खांबाळे गावाच्या सरपंचप्राजक्ता कदम यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपसरपंच गणेश पवार, सरपंच गौरी पवार, युवासेना तालुका समन्वयक दत्तात्रय परब, सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक चव्हाण, सरपंच विठोबा सुतार, ग्रा. पं. सदस्य अमोल चव्हाण, दीपक पवार, कृष्णा मोहिते, विठोबा मोहिते, तारा पवार, सीताबाई मोहिते, सतीश पवार, आप्पा पवार, विकास मोहिते इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या रस्त्याला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वाडीतील ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत साहेब व शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके आणि खांबाळे ग्रामपंचायत यांचे आभार मानले आहेत.













