मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थगड-आडवली येथे श्री स्वामी जयंती उत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ११ आणि १२ एप्रिल रोजी रात्री ९.०० वा. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे. प्रथम पारितोषिक रु. ९०००/- सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु.७०००/- सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रु.५०००/- सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ बक्षीस. सर्व स्पर्धकांनी वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धकांनी ३० मार्च पर्यंत संपर्क साधणे आवश्यक आहे.अधिक महिती साठी डॉ. सिद्धेश सकपाळ ( ९४२०८९०८१०), प्रकाश गवस (९४०३३५०८४९), सिताराम सकपाळ (९४२०२१०२६२), अतुल घाडीगांवकर ( ९५७९०५८९०३), समीर घाडी (९३५९५०८१२१), गणेश घाडी(९२८४६२०५३२), आकाश तावडे ( ९३५६७४६३६४) येथे संपर्क साधावा असे आवाहन स्वामी समर्थ मठ आडवली यांनी केले आहे.