भाजप आचरा विभाग, प्रकाश मेस्त्री, समिर बावकर मित्र मंडळा कडून आयोजन
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थित विलास हडकर यांच्या हस्ते केक कापून माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस उत्सात साजरा
आचरा (प्रतिनिधी) : आचरा मांगल्य मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी आचरा विभाग, प्रकाश मेस्त्री, समिर बावकर मित्र मंडळ आयोजित विश्वकर्मा सन्मान योजना मोफत नोंदणी शिबिराला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, या शिबीरात 273 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.तर 30 जणांची आधार अपडेट्स करण्यात आले.
प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते श्री रामेश्वरच्या प्रतिमेला पुष्पहार करून तर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, वायगणी सरपंच रुपेश पाटकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उद्योजक प्रकाश मेस्त्री, समिर बावकर, माजी सभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर मान्यवरांचे स्वागत, समिर बावकर, ओमकार आचरेकर, शेखर सुतार, चंदू कदम, चंदू सावंत, विवेक परब, नरेंद्र मेस्त यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत जेष्ठ भाजप नेते विलास हडकर यांच्या हस्ते केक कापून माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकाश मेस्त्री, समिर बावकर मित्र मंडळ आयोजित हे शिबीर पंतप्रधान मोदीनच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतील महत्वाच पाऊल असून आपले अशा कार्यक्रमाना नेहमी सहकार्य असेल तसेच 3000 जणांची नोंदणी व्हावी असे आपले प्रयत्न आहेत असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जेष्ठ भाजप नेते विलास हडकर यांनी यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने बाबत विचार मांडले. पळसंब सरपंच महेश वरक, ओमकार आचरेकर, सिद्धेश गोलतकर, रावजी(चंदू) सावंत, स्नेहलता मेस्त्री, संदेश रावले, परेश चव्हाण, चंदू कदम, रवींद्र घागरे, शेखर सुतार, एकनाथ पवार, धर्माजी कोचरेकर, सुहास सावंत, किशोर आचरेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात साठी मेहनत घेतली.
यावेळी नाभिक समाज जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, शिवसेना तालुकाध्यक्ष महेश राणे, माजी सभापती राजू परुळेकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, हनुमंत प्रभू, चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, आचरा सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, अश्विन हळदणकर, दत्ता वराडकर, रोहन वराडकर, मनोज हडकर, जितेंद्र तिरोडकर, संदेश चिंदरकर, सिद्धेश नाटेकर, विश्राम माळगावकर, यशश्री गोसावी, सुरेंद्र मेस्त्री, किरण पवार, विलास लोके, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश मेस्त्री यांनी तर सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले.












