खारेपाटण चेक पोस्ट येथे स्थिर सर्व्हेक्षण पथक कार्यरत…
खारेपाटण (प्रतिनिधी) : देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण चेक पोस्ट येथे या कामी स्थिर सर्वेशन पथक अर्थात एस एस टी पथक हे पथक कार्यरत करण्यात आले आहे.निवडणूक आयोगाच्या वतीने संपूर्ण देशात आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर लगेचच अशा प्रकारची पथके खारेपाटण सह महत्वाच्या ठिकाणी महाराष्ट्र व संपूर्ण भारत देशात नेमण्यात आली असून. जिल्ह्यात जाणाऱ्या व येनाऱ्या प्रत्येक खाजगी वाहनाची तसेच प्रत्येक वाहनांची कसून तपासणी व चौकशी केली जात आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकात प्रशासनाच्या महसूल,वन,राष्ट्रीय महामार्ग तसेच होमगार्ड व पोलीस विभागातील किमान ४ कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली असून सद्या खारेपाटण येथे या पथकाचे प्रमुख म्हणून आर एल.शिंदे यांसह एस व्ही दळवी,वैभव नामदेव घाटगे,श्रीम.एस एन कुवेसकर हे कर्मचारी काम करत आहेत.सकाळी ८.०० ते रात्री ८.०० असे दिवसा एक पथक तर रात्री ८.०० ते सकाळी ८.०० असे नाईट ला एक पथक अशी एकूण दोन खारेपाटण चेक पोस्ट येथे २४ तास कार्यरत ठेवण्यात आली असून या पथकाला पोलीस प्रशासनाचे कर्मचारी संपूर्ण सहकार्य करीत आहेत.
नुकत्याच जिल्ह्यात दोन मोठ्या कारवाईच्या घटना घडल्या असून यामध्ये खारेपाटण चेक पोस्ट येथे अवैध्य रित्या दारू वाहतूक करणारा आयशर टेम्पो सबंधित पथकाने पकडला असून सुमारे ६३ लाख ८८ हजार४०० रुपये किमतीची कारवाई करण्यात आली आहे.तर दुसरीकडे फोंडाघाट चेकपोस्ट येथे एक गाडीत सुमारे १० लाखाची अवैध्य रोकड जप्त करण्यात आली असून जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दोन्ही घटना या प्रशासनाला किबहूना निवडणूक आयोगाला आव्हान देणाऱ्या व विचार करायला लावणाऱ्या असून अजून पुढील काळात अजून काय काय घडेल ? याकडे सऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.तर निवडणूक आयोग सद्या ॲक्शन मोड वर असून स्थिर सर्वेक्षण पथके आपली कामगिरी चोख भाजावित आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण तपासणी नाका आर्थात पोलीस चेक पोस्ट येथे सर्वच वाहनाची कसून तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे केली जात असून आचारसहिंतेचा कोणताही भंग होणार नाही.व निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.व कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. याबाबत काटेकोरपणे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन प्रशासनाकडून काम केले जात आहे.
__________________________












