बुंधा आरपार पेटल्याने झाड कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता
फोंडाघाट (प्रतिनिधी) : हवेलीनगर मधील कोजागिरी क्र.४ येथील देवगड -निपाणी राज्जमार्ग,लगत जुनाट वृक्षाच्या बुंद्यात,होळीच्या रात्री अज्ञातानी आग पेटविली. त्यामुळे बुंधा मुळापासून जळून खाक झाला. आरपार बुंधा पेटल्याने कमकुवत झालेले झाड काहीसे कललेही आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर, पांथस्थावर झाड कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. आपण केलेल्या कृत्याचा विधीनिषेध नसलेल्या अज्ञाताच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.याबद्दल संबंधित विभागाने लक्ष देऊन झाड जमीनदोस्त करून संभाव्य धोका टाळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













