नागरिकांना आरोग्य सुविधा आणि औषधं देणं हे सरकारचे काम आहे

महिलांनी आरोग्याची संकल्पना व अधिकार समजून घेणे अत्यंत गरजेचे – डाँ.जालिंदर अडसुळे

नवजीवन महिलांसाठी आरोग्य समजून घेताना व आरोग्य आधिकार या विषयावर डाँ.जालिंदर अडसुळे यांचे मार्गदर्शन सत्र संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : नागरिकांना आरोग्य सुविधा आणि औषधं देणं हे सरकारचे काम आहे. आरोग्य शिबिरातील शिबिरार्थीं महिलांनी आरोग्याची संकल्पना व आरोग्याचा अधिकार समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. महिला निरोगी राहिल्या तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहिल असे प्रतिपादन समता शिक्षण संस्था-पुणेचे सचिव व समता शिक्षण संस्था पुणे संचलित डाँ.बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प चे संचालक डाँ.जालींदर अडसुळे यांनी धुळे येथील आदिवासी महिला आरोग्य शिबिरात बोलताना केले.

डाँ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प व फर्स्ट क्राय संस्था धुळे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून दि.२२ व २४मार्च २०२४ रोजी आयोजीत आरोग्य शिबिरात “आरोग्य समजून घेताना व आरोग्य अधिकार” या विषयावरअडसुळे बोलत होते. या शिबिर सत्रात त्यांनी मानवी अवयवांच्या चित्रांआधारे महिलांचे आरोग्य विषयावर संवाद घडवून आणला. विषयसत्रातील सहसुविधाकारांनी विविध आरोग्य विषयक पोस्टर्स आधारे माहिती दिली. प्रकल्पाच्या समन्वयक प्रा.रचना अडसुळे यांनी ” घरातील स्त्री जर आजारी असेल तर घराचे वातावरण बिघडते.मात्र तिचे आरोग्य चांगले असेल तर ती आपल्या कुटुंबाला चांगले सांभाळू शकते, कुटुंबातील सर्व मंडळीकडे चांगले लक्षदेवू शकते.म्हणून महिलांनी आधी स्वतःच्या आरोग्याकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे.” असे म्हटले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे चा ‘नवजीवन : महिलांसाठी आरोग्य प्रकल्प, धुळे’ हा एक महत्वाचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाद्वारे ग्रामीण व शहरी भागात राहत असलेल्या आदिवासी महिलांमधे आरोग्यविषयी जनजागृती करणे, रक्ताचे प्रमाण कमी असणाऱ्या महिलांवर विशेषतः लक्ष देणे, महिलांना आरोग्य समस्यांवर सेवा पुरवणे इ.कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सुविधाकार डॉ. जालींदर अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे च्या सेमिनार हाँलमधे संपन्न झालेल्या विषय सत्रात त्यांनी मानवी अवयवांच्या चित्रांद्वारे महिलांसमवेत आरोग्य विषयक संवाद घडवून आणला. विषय सत्रातील सह सुविधाकारांनी विविध आरोग्य विषयक योजनांची पोस्टर्स आधारे माहिती दिली. प्रा. रचना अडसुळे (समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प) यांनी सदर कार्यक्रमांचे संयोजन व प्रास्ताविक केले. तर प्रा. सुनिता पाटील (कार्यक्रम अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर किसन चौरे (समन्वयक, नवजीवन प्रकल्प) यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रम संयोजनात गणेश उफाडे, योगिता पवार यांचेसह काँलेजच्या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!