कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर ओसरगाव टोलनाक्यानजीक शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर चा अपघात झाला. कंटेनर क्र. एम. एच. ०४ एच. वाय. ९३०६ हा गोवा ते मुंबई च्या दिशेने चालला होता. दरम्यान कंटेनर ने आपली लेन बदलली आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन साईडचे लोखंडी बॅरिगेट्स तोडून कंटेनरचा अर्धा भाग नजीकच्या शेत जमीनित व अर्धा भाग महामार्गावरील एका लेनवर होता. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र कंटेंनरचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अपघात होताच कंटेनर चालकाने तेथून पलायन केले. हा अपघात ओसरगाव गोडावून च्या पुढे ५० मिटर या ठिकाणी घडला. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस ए. पी. आय. ज्ञानेश्वर पाठक, पोलिस हवालदार श्री. वेंगुर्लेकर, श्री. देसाई, श्री. सरमळकर, श्री. डिसोझा, श्री. भुतेलो तसेच पोलीस कॉन्स्टेबल दत्ता कांबळे यांनी अपघातस्थळी धाव घेत महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.