“भारत देशाच्या संस्कारा मध्ये जैन धर्माचे मोठे योगदान” – अजय मिश्रा
खारेपाटण (प्रतिनिधी) : “आपल्या भारत देशामध्ये विवधा जाती धर्माचे संप्रदायाचे लोक राहत असून देशाच्या उत्थानात व संस्कारात तसेच इतिहासात जैन धर्माचे मोठे योगदान राहिले असल्याचे भावपूर्ण उदगार भारत सरकारचे केंद्रिय गृहराज्यमंत्री अजयजी मिश्रा यांनी खारेपाटण येथील जैन बांधवांच्या मेळाव्यात बोलताना काढले.
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्तरावरून ‘लोकसभा प्रवास व जनतेशी संवाद ‘ या उपक्रमाअंतर्गत खारेपाटण येथील प्रसिद्ध दिगंबर पार्श्वनाथ जैन मंदिर ला काल केंद्रिय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी सायंकाळी उशिरा भेट दिली होती.यावेळी दिगंबर जैन समाज सेवा मंडळ खारेपाटण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमाचे त्याच्या शुभहभस्ते दीपप्रज्वलन करून उद्घघाटन करण्यात आले.यावेळी येथील जनतेशी थेट संवाद साधत येथील अल्पसंख्यांक समूहाच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार,सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक श्री अतुल काळसेकर,भाजप कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर,मनोज रावराणे,माजी जि.प. सदस्य श्री रवींद्र उर्फ बाळा जठार,माजी पं.स.सदस्य सौ तृप्ती माळवदे, खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर,संदीप लेले,आमित आवटी,खारेपाटण जैन समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री विलास डोर्ले,सूर्यकांत भालेकर,राजेंद्र ब्रम्हदंडे,सुधीर कुबल,ग्रा.प.सदस्य सौ मनाली होनाळे,शीतीजा धुमाळे, अमिषा गुरव,धनश्री ढेकणे,श्री किरण कर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी केंद्रीय मंत्री अजयजी मिश्रा यांनी येथील जैन मंदिराचे दर्शन घेतले.यावेळी जैन समाज बांधवांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. देशातील महत्वाचे झारखंड येथील जीवन धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ पर्यटन केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.याला जैन धर्मीय बांधवांचा विरोध असून सदर प्रस्ताव रद्द करण्यात यावा. व त्याचे पावित्र्य राखण्यात यावे.या आशयाचे निवेदन जैन बांधवांच्या वतीने देण्यात आले. त्याबाबत केंद्र सरकार निश्चित प्रयत्न करणार असून ते रद्द करण्यात येऊन त्याचे पावित्र्य राखले जाईल असे आश्वासन यावेळी मंत्री मिश्रा यांनी उपस्थित जनसमुदायाला दिले.
यावेळी खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर व खारेपाटण रेल्वे स्टेशन कृती समीतीचे सचिव श्री सूर्यकांत भालेकर यांनी खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन ला प्लॅटफॉर्म बांधून देण्याबाबतचे लेखी निवेदन मंत्री अजय मिश्रा यांना दिले. खारेपाटण रेल्वे स्टेशन ला लवकरच प्लॅटफॉर्म बांधून मिळेल. असे आश्वासन खारेपाटण नागरिकांना मंत्री मिश्रा यांनी दिले. तसेच यावेळी जैन समाज बांधवांच्या वतीने विविध विकासकामाची निवेदने केंद्रीय मंत्री अजयजी मिश्रा यांना देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाळू पंडित यांनी मानले.