केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणी माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काम करत आलो.मी आपल्यातीलच एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोकणासाठी मी केलेले माझे काम आपल्यासमोर आहे. शिवाय केवळ नामधारी आमदार न राहता नितेश राणे गेली दहा वर्षे आपल्या मतदारसंघात जनतेचे प्रश्न शाळा, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, यांसाठी दिवस रात्र जनतेसाठी वेळ देत आहेत त्यामुळे मताची चिंता करण्याचं कारण नाही असा ठाम विश्वास नारायण राणे यांनी यावेळी आपल्या भाषणात व्यक्त केला. नितेश राणे यांचे काम आपण पाहिलेली आहेत. निवडणुका येतात जातात आपण माणसे जोपासायची असतात असा सल्ला नारायण राणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. यावेळी अबकी बार 400 पार ..! ची घोषणा देखील त्यांनी आपल्या भाषणात केली. देशातील महिला, तरुण , वयोवृद्ध व इतर नागरिकांसाठी केंद्राच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या गेल्या, कोरोना काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी मोफत धान्य वितरण केलं. तर उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात मुख्यमंत्री असताना औषधातून पैसे खाल्ले असल्याचा टोला लगावला. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील अर्थव्यवस्थेमध्ये आता भारत चौथ्या क्रमांकावर तर संरक्षण क्षेत्रात देखील इतर देशांच्या तुलनेत आपण आज अग्रेसर आहोत याची कार्यकर्त्यांनी माहिती दिली.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, वैभववाडी तालुकाध्यक्ष नासीरभाई काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, नगराध्यक्ष नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, जि.प.सदस्य सुधीर नकाशे, प्राची तावडे, नवलराज काळे आदी भाजपा बुथ अध्यक्ष, शक्ती प्रमुख, सोसायटी चेअरमन व भाजपा पदाधिकारी तसेच मित्र पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











