कासार्डे माध्य.विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची नवोदय विद्यालयात निवड

तळेरे (प्रतिनिधी) : नवोदय विद्यालय समिती तर्फे 20 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या निवड परीक्षेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या पाचवीतील कु.समृध्दी प्रकाश चौगुले व कु.सूची सिध्दण्णा दोडमनी दोन विद्यार्थिनींनी घवघवीचे संपादन केले असून या दोन्ही विद्यार्थ्यिनींना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणार आहे.त्या नवोदय विद्यालयात इ.6वी साठी पात्र ठरल्या आहेत.

या यशस्वी विद्यार्थ्यिंनींना सोनाली पेडणेकर, ऋचा सरवणकर, पूजा पाताडे व नवनाथ कानकेकर या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यिंनींचे प्रशालेचे मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर, पर्यवेक्षक एस.डी.भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच, स्थानिक व्यवस्था समितीचे सर्व पदाधिकारी,स्कुल कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!