ट्रिकसीनयुक्त ‘व्यंकटेश पद्मावती’ दशावतार नाट्यप्रयोग विशेष आकर्षण
आचरा (विवेक परब) : भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा, बुधवार 10 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे, सकाळी 5 वा. – दुग्ध अभिषेक, सकाळी 7.30वा. -नित्य आरती, सकाळी 9 वा. -अभिषेक, दुपारी 11 वा. – दिंडी भजन / भक्ती संगीत, दुपारी 12.30 वा. – आरती, दुपारी 1 वा. -महाप्रसाद, सायं. 4 ते रात्रौ 8 वा. – स्थानिकांची भजने, रात्रौ ठिक 10 वाजता, ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या भव्य पटांगणावर, लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटय मंडळ, नेरुर यांचा ट्रिकसीनयुक्त दशावातारी नाट्यप्रयोग “व्यंकटेश पद्मावती” सादर होणार आहे तरी भक्तगणांनी तीर्थप्रसाद, महाप्रसादाचा लाभ घ्यावा व नाट्यरसिकांनी नाट्यप्रयोगचा आनंद घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणीच्या वतीने करण्यात आले आहे.