नारायण राणेंच्या रुपात कोकणात भाजपाचा पहिला खासदार निवडून देऊया – प्रभाकर सावंत

फोंडाघाट (प्रतिनिधी) : लोकसभेची निवडणूक ही देशाच्या विकासाला कलाटणी देणारी आहे. कोकणचे भाग्य बदलणारी अशी ही निवडणूक आहे.भारतीय जनता पार्टीचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा पहिला खासदार केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या रुपात येत्या 4 जून रोजी निवडून येणार आहे असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या फोंडाघाट विभागाचा महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे संपन्न झाला. त्यावेळी सावंत बोलत होते. 200 कोटींचे टेक्निकल सेंटर केंद्रीयमंत्री राणे यांनी ओरोसला आणले आहे. देशातील 800 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांत हे सेंटर असणार आहे त्यातील एक सिंधुदुर्ग आहे. विश्वकर्मा योजना, उज्वला गॅस , मोफत धान्य, आयुष्यमान आरोग्य सुविधा आदी अनेक जनहिताच्या योजना पंतप्रधान मोदी यांनी सुरू केल्या आहेत. खासदार विनायक राऊत यांची खळा बैठक म्हणजे गळा बैठक असल्याची टीकाही सावंत यांनी केली. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून मोठया लीडने भाजपा खासदाराला मिळेल असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.यावेळी आमदार नितेश राणे, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , संतोष कानडे, फोंडाघाट सरपंच सौ.संजना आग्रे,लोरे नं 1 सरपंच अजय रावराणे,पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर,कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर,फोंडाघाट उपसरपंच तन्वी मोदी,घोणसरी उपसरपंच दीप्ती कारेकर,डॉ. मिलिंद कुलकर्णी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर,फोंडाघाट विकास सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे,फोंडाघाट एजुकेशन सोसा. चेअरमन सुभाष सावंत,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे,माजी सभापती सदानंद उर्फ बबन हळदिवे,माजी सभापती सुजाता हळदिवे,शक्ती केंद्र प्रमुख विश्वनाथ जाधव, गजानन सावंत,नरेश गुरव, वाघेरी माजी सरपंच संतोष राणे,नवीन कुर्ली वसाहत चे राजेंद्र कोलते,शिवसेना विभाग प्रमुख शांताराम राणे उपस्थित होते.

error: Content is protected !!