30 मे नंतर करूळ गगनबावडा घाटातून वाहतूक सुरू होण्यासाठी युद्धपातळीवर काम करा

जिल्हाधिकारी तावडे यांनी करूळ घाटरस्ता कामाची केली पाहणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : 30 मे नंतर करूळ घाटातील वाहतूक सुरु झाली पाहिजे. त्या पद्धतीने कामाचे नियोजन करून युद्ध पातळीवर काम करा. अशी सक्त  सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. तर भुईबावडा घाटातून अवजड वाहतूक सुरु करने बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

सध्या करूळ घाटात नूतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे जड,अवजड वाहतूक राधानगरी व अणुसकुरा घाटातून तर हलकी व प्रवाशी वाहतूक सुरु आहे. भुईबावडा घाटातून जड वाहतूक बंद असल्यामुळे जिल्यातील वाहतूकदाराची अडचण होत आहे. या घाटातून जड वाहतूक सुरु करण्याची मागणी वाहतूकदार संघटनाकडू करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तावडे यांनी करूळ व भुईबावडा घाटाची पाहणी केली.यावेळी तसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरांचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण  जाधव, अभियंता अतुल शिवनिवार, सार्वजनिक बांधकामचे उपाभियंता विजय जोशी, श्री दुडीये, करूळ घाटाचे ठेकेदार मिलींद वेल्हाळ आदी उपस्थित होते.

करूळ घाटातील रस्त्याचे काम दर्जेदार व जलद गतीने करून 31 मे अखेर घाटातून वाहतूक सुरु करण्याचे नियोजन करा. अशी सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना केली. त्यांनी ते मान्य केले आहे.

त्यानंतर त्यांनी भुईबावडा घाटाची पाहणी केली. भुईबावडा घाटातून जड वाहतूक सुरु करावी अशी मागणी वाहतूकदार संघटना, बागायतदार शेताकरी यांनी जिल्हाधिकारी तसीलदार यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे आमदार नितेश राणे यांनी ही या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले होते. या घाटाची पाहणीही जिल्हाधिकारी यांनी केली. या घाटातून अवजड वाहतूक करताना सुरक्षितते बाबत सूचना केल्या. जास्त लांबीची वाहने या घाटातून करता येणार नाही.बाकीची वाहतूक कमी वेगाने करावी लागेल. अवजड  वाहतूक सुरु करणायचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. असे त्यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!