गुजरात सुरेंद्रनगर येथील व्यसनाधीन व मानसिक आजारी व्यक्ती छेलुभाई सोरानी यांचे अवघ्या दोन दिवसांत झाले कुटुंबपुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातून मित्रमंडळींसह गोव्याकडे कामासाठी आलेला एक अनोळखी इसम व्यसनाच्या अधिन जावून त्याच्या सहका-यांच्या समुहापासून भरकटला.आणि तो निराधारपणे वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथे भटकताना तेथील ग्रामस्थांना आढळला.अनोळखी इसमाच्या चौकशीत त्याचे नाव छेलुभाई मावजभाई सोरानी असून त्याचे सिरोडा गाव गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात येते असे समजृले. मात्र गावाच्या नावातील साधर्म्यामुळे आणि शैलुभाई बोलत आसलेली भाषा समजत नसल्याने त्याला आरवली ग्रामस्थांनी शिरोडा ता.वेंगुर्ला पोलीस दूरःक्षेत्रमधील पोलीसांच्या हवाली केले. त्याची भाषा न समजून त्यास कोणी चोर लफंगा समजून मारू नये म्हणून ग्रामस्थांनी त्याला पोलीसांच्या हवाली केले.शिरोडा पोलीसांनी नातलगांचा शोध लागेस्तोवर त्यास सुरक्षेकामी संविता आश्रमात दाखल केले.

संविता आश्रमात शैलुभाई दोरानी हा केवळ दोन दिवस वास्तव्यास होता. आश्रमात त्याने सांगीतलेल्या गावः सिरोडा ता.छोटिला, जिल्हा सुरेंद्रनगर गुजरात राज्य या माहितीवरून आश्रमचे व्यवस्थापक व पणदूरचे पोलीस पाटिल देवू सावंत व आश्रमच्या स्टाफ विजया कांबळी यांनी गुगल आधारे त्याचे गाव आणि नातलगांशी संपर्क करण्यात यश मिळविले.नुकतेच शैलुभाईचे नातलग व मित्रांनी त्यास संविता आश्रम येथून ताब्यात घेतले.दरम्यान जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी मानसिक आजारी बांधवांच्या कुटुंबियांचा वेगाने शोध घेवून त्याचे कुटुंब पुनर्मिलन घडवून आणल्याबद्दल देवू सावंत,विजया कांबळी व सहकारी टिमचे कौतुक आणि अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!