उद्धव आणि संजय राऊत हे पिसाळलेले कुत्रे
संजय राऊत खाल्ल्या ताटात घाण करणारा नमकहराम
आमदार नितेश राणेंची प्रखर टीका
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : नसबंदी झालेले दोन पिसाळलेले कुत्रे रोज भुंकत आहेत. काल धारावीत उद्धव ठाकरे भुंकला तर आज सकाळी संजय राजाराम राऊत पिसाळलेल्या कुत्र्यासारखा बडबडला. म्हणे फडणवीस यांना केंद्रात गृहमंत्री बनायचे होते म्हणून फडणवीस यांचे पंख छाटून त्यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले. संजय राऊत हा खाल्ल्या ताटात घाण करणारा आहे. संजय राऊत लाच 2019 मध्ये मुख्यमंत्री व्हायचे होते, काही आमदारांना त्याने स्वतःचे नाव सीएम पदासाठी चालवा असे सांगत होता. ह्याचा मालक उद्धव मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पाहत असताना हा राऊत आमदारांची बैठक घेऊन नमकहरामी करत होता अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. स्वतःच्या पंगतीत फडणवीस यांना बसवायची हिम्मत संजय राऊत ने करू नये. धारावीच्या सभेत उद्धव म्हणाले की बाळासाहेब राहत असलेली खोली त्यांच्यासाठी पवित्र आहे. बाहेर जाताना त्या खोलीत नतमस्तक होऊन बाहेर पडतो. ज्या बाळासाहेबांना अखेरच्या दिवसात म्हातारा, कुत्रा म्हणणाऱ्या उद्धव ने बाळासाहेबांची अवस्था काय केली हे आम्हाला माहिती आहे. बाळासाहेब जिवंत असताना अखेरच्या दिवसांत त्यांना औषधे जेवण वेळेवर उद्धव ने दिली नाही. अखेरच्या दिवसांत बाळासाहेबांचे हाल उद्धव ने केले. आता श्रावण बाळ होण्याचा आव उद्धव याने आणू नये असा टोला नितेश राणे यांनी लगावला.राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत म्हणणाऱ्या संजय राऊतवर जोरदार टीका नितेश राणे यांनी केली. एकदा उद्धव पंतप्रधान व्हावा, एकदा राहुल गांधी म्हणत स्वतःचे राजकीय बाप संजय राजाराम राऊत दरदिवशी बदलत आहे. संजय राऊत हा 90 इफेक्ट मध्ये बडबड करतो. देवेंद्र फडणवीस सारख्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला संजय राऊत कडून कॅरॅक्टर सर्टिफिकेट देऊ नये असा उपरोधिक टोला नितेश राणे यांनी लगावला.













