उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार

ब्युरो न्यूज (मुंबई) : लोकसभा निवडणुकीमध्येच निवडणूक आयोगाकडून नोटीस आल्याने उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार आहेत. ठाकरे यांनी शिवसेना फुटल्यापासून आणि पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यापासून निवडणूक आयोगाला धारेवर धरलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडून आलेल्या नोटीशीवर जोरदार बोलण्याची शक्यता आहे. मशाल गीतामध्ये भवानी शब्द आल्याने निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांना नोटीस आल्याचे समजते. विरोधकांची अनेक उदाहरणे देऊन निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!