कणकवली (प्रतिनिधी) : शेर्पे मुस्लिमवाडी येथे घरफोडी करून चोरट्याने ८,५०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना रविवारी २१ रोजी रात्री ११.५५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
शरफुद्दिन अब्दुल लतीफ जैतापकर (६० रा. शर्पे- मुस्लिमवाडी) हे रविवारी रात्री नातेवाईकाच्या मुलीची हळद असल्याने घराला कुलूप लावून ते कुटुंबीयांना घेऊन त्यांच्या घरी गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटपून ते पुन्हा घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिला. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील साहित्य अस्थाव्यस्त पडलेले होते आणि घरातील कपाट फोडून त्यातील ८,५०० रुपयांचे ठेवलेली रक्कम लंपास केल्याचे त्यांना दिसून आली. याप्रकरणी शरफुद्दिन अब्दुल लतीफ जैतापकर फिर्याद दिली आहे. त्यानुसार कणकवली ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. याबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक शरद देठे करीत आहे.