फोंडाघाट (प्रतिनिधी) : 29 एप्रिल रोजी लोरे नं 1 येथे लोकसभेचे महायुती चे उमेदवार नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री देव गांगोचाळा मंदिर येथे श्री फळ वाढवून करण्यात आली. ह्यासाठी कणकवली विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे. कृषि उत्पन्न बाजारसमिती सभापती तुळशीदास रावराणे. लोरे घोणसरी शक्ती केंद्र प्रमुख नरेश गुरव, लोरे सरपंच अजय रावराणे उपसरपंच सुमन गुरव, जगदीश बाबर (सोलापूर) प्रभाकर रावराणे, अनंत रावराणे, प्रकाश रावराणे, अलंकार रावराणे, सुनील रावराणे, कृष्णा गुरव, अनिल रावराणे, महेश रावराणे, चिन्मय रावराणे, संजय खाडये बाबू खाडये, संतोष मोसमकर, रामचंद्र मोसमकर, आबू गुरव, मनोहर गुरव, सुनील गुरव, सुभाष गुरव, सुरेश शिरोडकर, सतीश कासले, सदा नापणेकर, सोन्या धुरी, अमित दळवी, राजेंद्र कोलते, बाळकृष्ण चव्हाण, शिवाजी चव्हाण, भाऊ नवले, विठ्ठल मांडवकर, वसंत मांडवकर, गुरुनाथ रावराणे, प्रदीप रावराणे, प्रकाश गुरव, भिकाजी गुरव, मुकुंद गुरव, दयानंद गुरव यांसह भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर नारायण राणे यांना आपल्या गावातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला तसेच घरोघरी जावून शेकडो कार्यकर्त्यांसह प्रचार करण्यात आला.