दोडामार्ग (प्रतिनिधी) : प्रमोद सावंत आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असले, तरी आज ते गोव्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि नारायण राणे यांचे प्रचारप्रमुख सुद्धा आहेत आणी हेच प्रमोद सावंत आपल्या इथल्या तरुणांना गोवा राज्यात नोकरी करण्यास बंधने घालत आहेत, त्यांचा रोजगार हिरावून घेत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की असे जर करणार असाल तर लक्षात ठेवा गोव्याची तहान भागावणारे तिलारी चे पाणी सिंधुदुर्गातून जाते. असा इशारा ही यावेळी त्यांनी प्रमोद सावंत यांना दिला.प्रमोद सावंत हे फक्त 700 मतांनी निवडून आले आहेत याची आठवण करून देत जर आमच्या पोरांच्या रोजगाराच्या मुळावर जर ते उठत असतील तर पुढच्या निवडणुकीत त्यांचा बाजार उठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे ही खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
दोडामार्ग येथील पिंपळेश्वर हॉल येथे आयोजित लोकसभेच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सुरेशजी दळवी, बाळा गावडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या जान्हवी सावंत, राष्ट्रवादी शरद पवार च्या विभागीय अध्यक्ष अर्चनाताई घारे, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, इर्शाद शेख, लक्ष्मण वनगे, विवेक ताम्हणकर, जयेंद्र परुळेकर आदी इंडिया आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.
पुढे त्यांनी गोव्यात काजुला जो हमीभाव मिळतो तो आमच्या काजुला का दिला जात नाही असाही प्रश्न राज्यकर्त्यांना विचारला. त्याचबरोबर इकोसेन्सिटिव्ह मधल्या जाचक अटी रद्द करून दोडामार्ग साठी पर्यवारणपूरक विकास आराखडा, अडाळी एमआयडीसी येथील उद्योग, ग्रामस्थांना नको असलेले मायनिंग वर भाष्य करताना भाजप उमेदवार नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य सरकार व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
या सभेला सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः सर्वसामान्य लोकांची उपस्थिती लक्षवेधक होती.