पंढरपूरला रवाना झालेल्या पायी माघवारीत आ. वैभव नाईक झाले सहभागी
कुडाळ (प्रतिनिधी): तेर्सेबांबर्डे येथील वारकरी संप्रदायाची कुडाळ ते पंढरपूर अशी पायी माघवारी आज कुडाळ येथून रवाना झाली.हि वारी ओरोस येथे आली असता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे वारीमध्ये सहभागी झाले.आमदार वैभव नाईक यांनी ओरोस ते कसाल दरम्यान वारकऱ्यांसमवेत श्री.विठ्ठल नामाचा जयघोष करीत पायी प्रवास केला.हातात टाळ डोक्यावर टोपी परिधान करून पायीवारीचा आनंद त्यांनी घेतला.