” बंध रेशमाचे ” व्हाट्सअप ग्रुपचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

समर्थ आश्रमातील बांधवांना एक हात माणूसकीचा देवून साजरा केला संक्रातीचा सण

खारेपाटण (प्रतिनिधी) : लाखो कोट्यावधी लोकांचं पोट भरणा-या मुंबईनगरीत तसं पाहिलं तर प्रत्येक जण नेहमी घाईगडबडीत असतो. कुणाशी सवड काढून बोलायलाही इथे वेळ नसतो. मात्र एवढ्या सगळ्या रोजच्या घाई गर्दितही अशीही माणसं मुंबापुरीत आहेत.जे आपण आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या पलिकडे पाहत असतात.

अशाच संवेदनशील माणसांच्या परस्पर संवादातून तयार झालेला एक व्हाट्सअप ग्रुप म्हणजे बंध रेशमांचे… या गृपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या गट सदस्यांनी नुकताच मकर संक्रातीच्या पुर्वसंध्येला आठवड्याच्या शेवटी विकेण्डला जीवन आनंद संस्थेच्या मुंबई विभागातील समर्थ आश्रमला भेट दिली.आणि आश्रमातील बांधवांना संक्रातीचा तिळगुळ देवून आनंद साजरा केला.

यावेळी आश्रम मधील महिला भगिणींना नवीन नाईटी गाऊन व पुरूष बांधवांना नवीन टिशर्ट तसेच सर्वांसाठी नवीन चादरी आणि आश्रममधे पिण्याच्या पाण्यासाठी वाँटर प्यूरिफायर, इनव्हर्टरची मशीन,किराणा साहित्य ठेवण्यासाठीचे डबे इ.साहित्य भेट भेट देण्यात आले.

समाजातील निराधार वंचितांच्या हितासाठी ….जाणिवपुर्वक कार्य करणा-या बंध रेशमाचे ग्रुपचे घोषवाक्यच आहे, एक हात माणुसकीचा…या गटाच्या प्रतिनिधी सदस्यांनी काही दिवस आधी आश्रमला भेट देवून आश्रमची गरज समजून घेवून त्यानुसार आश्रमात द्यायच्या मदतीचे स्वरूप निश्चित केले.अशी माहिती समर्थ आश्रमच्या इन्चार्ज ऊज्वला जाधव यांनी दिली.

    बंध रेशमाचे व्हाट्सअप ग्रुपमधील सदस्य हे मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील मुख्य शहर आणि उपनगरांत विखुरलेले आहेत.या ग्रुपच्या अध्यक्षा दर्शना कुरमे, राहणार गोरेगाव , दिपाली बाळकृष्ण राणे , निरू आणि जितेश दयालाल मकवाना, आशिष पाडे सर्व राहणार नालासोपारा, राजु बाळकृष्ण आंबेकर- विक्रोळी, हेमलता  शेमडकर व चंद्रकांत सुर्यवंशी-ठाणे लोकमान्यनगर,कमलेश दामोदर शेवाळे-चारकोप कांदिवली, सचिन गोपाळ उतेकर-बांद्रा,सिमा बोदडे-उल्हासनगर,विनोद पाटिल-भांडुप,अमोल कदम-दादर यांनी समर्थ आश्रमात प्रत्यक्ष भेट दिली.आणि येथील बांधवांना एक हात माणूसकीचा देवून  बांधवांसमवेत संक्रांतीचा आनंद साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!