वैभववाडी (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीचे मतदान वैभववाडी तालुक्यात सर्वत्र शांततेत पार पडले. तालुक्यात एकूण 58 मतदान केंद्रावर पार पडले. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. उंबर्डे मेहेबूबनगर व कोळपे येते विशेष पोलीस बंदोबस्त होता.
वैभववाडी तालुक्यात एकूण 32 हजार मतदार आहेत. मात्र यातील अनेक मतदार हे कामधंदयासाठी मुंबई पुणे सारख्या शहरात असल्यामुळे एकूण होणाऱ्या मतदानचा टका घसरल्याचे चित्र आहे. सकाळपासून विविध पक्षांचे पदाधिकारी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. वयोवृद्धांना खाजगी वाहनातून मतदान केंद्रावर मतदानासाठी आणले जात होते. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत धीम्या गतीने मतदान सुरू होते. मात्र नऊ ते अकरा दरम्यान मतदार मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडल्याचे दिसत होते. दुपारी मात्र मतदानाची गती काहीशी मंदावल्याचे जाणवत होते. तर सायंकाळी उष्णतेचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा मतदार मतदाना साठी बाहेर पडल्याचे पहिला मिळाले.
तालुक्यात भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे व महाविकास आघाडी उबाठाचे विनायक राऊत यांच्यात प्रमुख लढत होत असून. वैभववाडी तालुक्यातून कोणाला आघाडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.












