कणकवली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक न्याय संघटन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी सी.आर. चव्हाण यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
सी. आर. चव्हाण हे सामाजिक कार्यात अग्रेसर असुन ते विविध संघटना, सामाजिक संस्थावर कार्यरत असुन गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणुन चांगले काम केल्याने त्यांना पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड राष्ट्रीय अध्यक्ष निरजासिंह यांनी केली आहे.
सी.आर. चव्हाण हे सध्या माहीती अधिकार कायदा जनजागृती अभियान संस्था महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणुन कार्यरत आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचे जिल्हा संघटक, संत रविदास सेवा भावी संस्था यांचे कोकण विभाग संपर्क प्रमुख, ग्रामसेवक कास्ट्राईब संघटना सल्लागार, कणकवली तालुका प्रवाशी संघ सचिव म्हणुन काम करीत आहेत सामाजिक, कलाक्रीडा, सास्कृतिक अशा सर्व क्षेत्रात काम करीत आहेत.
सी. आर. चव्हाण यांची सिंधुदुर्ग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.