मुलांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभागी व्हावे ; मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर
ओरोस (प्रतिनिधी) : निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उशिराने होत आहेत. पुढच्या वर्षी या स्पर्धा लवकर घेऊ. सध्या कडक ऊन असल्याने वातावरण तप्त आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करावी. मुलांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी व्हावे. विजय मिळविण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी डॉन बॉस्को येथे बोलताना केले.
जिल्हा परिषदेच्या शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्को हायस्कुलच्या क्रीडांगणावर १ ते ३ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. याचे उदघाटन प्रशासक नायर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश म्हात्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मूस्ताक शेख, निरंतर शिक्षणाधिकारी श्री कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक व स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.