शोषखड्डा उपक्रमात राज्यात कुडाळ पंचायत समिती सर्वोकृष्ट

कुडाळ (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात शोषखड्डा मोहीमेमध्ये एकमेव कुडाळ पंचायत समितीची सर्वोकृष्ट निवड झाली असून  पंचायत समितीने  पुन्हा एकदा यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे  महाराष्ट्र राज्यामध्ये 23291 शोषखडयामध्ये एका कुडाळ तालुक्यात 9317 असे सर्वाधिक शोषखड्डे मारण्यात आले या पुरस्काराचे वितरण 3 मार्चला मुंबई येथे होणार आहे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करुन सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजनेचा  शुभारंभ३ मार्च सकाळी११.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे
यावेळी  महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मा. विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र विधानमंडळ,  मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री, मा. मंत्री (रोहयो व फलोत्पादन), मंत्री (इतर मागास वर्गीय व बहुजन), मंत्री (आदिवासी),  मंत्री (वने), मंत्री (ग्रामविकास),  मंत्री (कृषी), मंत्री (महिला व बालविकास),. मंत्री (शालेय शिक्षण), मुख्यसचिव व . अपर मुख्य सचिव (रोहयो) यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे या कार्यक्रमासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वन संरक्षक (सामाजिक वनीकरण, सर्व उपजिल्हाधिकारी (रोहयो), सर्व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो), सर्व जिल्हा कृषी अधिकारी व सर्व जिल्हा रेशीम अधिकारी, नरेगा आयुक्तालयातील श्री. अनिल किटे, सहायक आयुक्त (पंचायत), श्री. प्रशांत डाबरे, सहायक संचालक (लेखा), श्री. अभय तिजारे व श्रीम. दिप्ती काळे (मानव विकास संसाधन), नागपूर तसेच राज्यातील ३४ जिल्ह्यामधील उत्कृष्ट काम करणारे १२० गट विकास अधिकारी हे हजर राहणार आहे
  गेल्या तीन वर्षात 2020 2021, 2022 ,व 2023 या वर्षात  ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हास्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या अधिकाधिक  संस्थाना सर्वोच्च ग्रामपंचायतना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे
यावेळी 2020 21, 2022 ,2023 या तीन वर्षांमध्ये  कोविड कालावधी असतानासुद्धा  ग्रामपंचायत तालुका व जिल्हा स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण  काम करताना कुडाळ तालुका पंचायत समितीने गेली तीन वर्षे  माझं घर माझा शोषखड्डा हे अभियान राबवलं होतं जिल्हा परिषद तत्कालिन अध्यक्ष संजना सावंत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित  नायर यांच्या  प्रमुख उपस्थितीत  या योजनेचा जिल्हा पातळीवरील शुभारंभ पणदूर येथे तर समारोप नेरूर  या ठिकाणी  करण्यात आला होता कोविड कालावधीमध्ये लोकांच्या हातात पैसा नव्हता रोजी रोटी कुटुंबाला मिळावी  म्हणून कुडाळ तालुक्यात 9317 शोषखड्डे मारून पूर्ण केले आणि या प्रत्येक शोषखडयामध्ये एका कुटुंबा मागे रु 2557 अनुदान मिळाले  राज्यामध्ये 23291त्यापैकी 9317 कुडाळ तालुक्याने शोषखड्डे मारले होते  या वैशिष्ट्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाची राज्य  शासनाने दखल घेतली असून कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी  विजय चव्हाण व सहायक प्रशासन अधिकारी चंद्रशेखर माळकर यांना निमंत्रित केलं असून त्यांचा  गौरव होणार आहे   याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे 1958 शेतकऱ्यांनी फळझाड लागवडीचा लाभ घेतला असून  1169 . 89 हेक्‍टर एवढी जमिन लागवडीखाली आणलेली आहे महाराष्ट्रामध्ये एमआरजीस मध्ये विविध असं वैशिष्ट्यपूर्ण केले
सामाजिक वनीकरण विहिरी गोठे अंगणवाडी या विविध क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य केलेल्याचा   सत्कार होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड याकोंकण विभागात कुडाळ पचायत समितीने बाजी मारली आहे कुडाळ  पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे  यापूर्वी गटविकास अधिकारी श्री चव्हाण हे देवगड येथे कार्यरत असताना हा तालुका जिल्ह्यात अग्रेसर होता आता कुडाळ तालुक्याने सलग तीन वर्षे राज्यात अव्वल तसेच महाआवास योजनेत अव्वल स्थान प्राप्त केले होते कोरोना कालावधीत पुरेसा कर्मचारी नसताना सुद्धा हे कार्यपद्धती राबवलेली आहे यामध्ये शेखर माळकर अधीक्षक नंदकुमार धामापुरकर शिल्पा वेंगुर्लेकर अमित देसाई मंदार पाटील विजया जाधव  रुपेश चव्हाण  तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सर्व सरपंच ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!