कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फ्रीस्टाइल राडा प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : आपापसात मारामारी करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल असे कृत्य केल्याप्रमाणे काल २८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कणकवली मध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणातील कणकवली व कुडाळ मधील एकूण चार संशयित आरोपींवर कणकवली पोलिसात भादवि कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे यांनी फिर्याद दिली आहे काल कणकवली ते शिवाजी महाराज चौकात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आपापसात वाद होत हाणामारीचा प्रसंग घडला होता या प्रकरणी आज कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये अमोल चिंदरकर कलमठ सतीश चिंदरकर कलमठ प्रज्वलवर्धन कणकवली योगेश गाडी कुडाळ या एकूण चौघांवर भादवि कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत

error: Content is protected !!