नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फत आर्थिक आधार

केवळ एक रुपयात भात, नाचणी या पिकांकरीता पीक विमा उतरविता येणार – विजयकुमार राऊत

ओरोस (प्रतिनिधी) : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता येणा-या प्रधानमंत्री पीक योजना, कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पुर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे. खरीप हंगामामध्ये कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी या पिकांकरीता पीक विमा उतरविता येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली आहे.

error: Content is protected !!