फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट कृषीदुतांनी ग्रामीण कृषी उद्योजकता जागरूकता विकास योजना 2024-25 अंतर्गत लोरे नं १ गावामध्ये विविध प्रात्यक्षिक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कृषीदुतांनी या गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षण, शेततळे, उंदीर नियंत्रण पद्धती, बीज प्रक्रिया पद्धती इत्यादी उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच अजय रावराणे, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व सदस्य यांचे सहकार्य लाभले. त्यामध्ये अविनाश तोडकर,ओंकार शिरतोडे, विशाल गौराजे, रितेश पाटील, प्रसेंजीत कामत,भरतकुमार पोला, श्रीराम कदम या कृषीदुतांनी सहभाग घेतला आहे. प्राचार्य संते सर, मोटे सर व तसेच इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.