सातरल – कासरल ग्रामस्थांची मागणी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन
कुडाळ (प्रतिनिधी) : जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा,सातरल-कासरल या शाळेजवळून कणकवली-असरोंडी -मालवण रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण सन २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. सदर रुंदीकरण वेळी शाळेच्या उत्तरेकडील कंपाउंड वॉल बांधकाम तोडून नव्याने कुंपण बांधण्याचे काम रस्त्याचे कामाच्या ठेकेदाराने सुरू केले होते.सदरचे नवीन कुंपण बांधकाम अपूर्ण स्थिती त ठेवण्यात आले आहे.तसेच शाळेचे प्रवेशद्वार ना-दुरुस्त झाले आहे.त्यामुळे शाळेच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या प्रशालेच्या कंपाउंड वॅल बांधकाम येत्या आठ दिवसात पूर्ववत सुस्थितीत करून देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता बामणे यांना देण्यात आले . कार्यकारी अभियंता बामणे यांनी तात्काळ संबंधित अभियंत्यांना ग्रामस्थांसमक्ष बोलावून घेत तात्काळ वस्तुस्थिती ची पाहणी करण्याचे आदेश देत ठेकेदाराकडून चिरेबंदी कुंपण पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सातरल सरपंच सौ. सविता मेस्त्री, माजी सरपंच श्री. प्रदिप राणे, ग्रा. पं.सदस्य श्री. सदाशिव राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रविंद्र राणे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. नागेश मेस्त्री तसेच समाजिक कार्यकर्ते श्री. सुहास राणे, श्री. रुपेश राणे, श्री. प्रसाद सावंत, श्री. अमित सावंत, श्री. विनायक सावंत, श्री. दशरथ सावंत, श्री. विनोद परब, श्री. संदीप श्रावणकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.