भ्रष्टाचार मुक्त भारत ते मताचा भ्रष्टाचार हा लोकशाहीचा उलटा प्रवास भांडवलशाही कडे जातो आहे – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : २०१४ साली ” भ्रष्टाचार मुक्त भारत ” या नॅरेटिव्हने देशात निवडणुकी नंतर परीवर्तन आणनार असे काहीसे वाटत होते. परंतु काल झालेल्या निवडणुकित आपल्या बेहिशोबी संपत्तीतून शतकोटी मतदारांना वाटून आपली निवडून येण्याची शेवटी ईच्छा सुद्धा काही उमेदवारांनी पूर्ण करून घेतली. खरतर, भ्रष्टाचार हा एवढा तळा पर्यंत पोचविण्याची पक्षशिस्त कार्यकर्त्यांनी ही तत्परता दाखवली आहे. पण , आपण भ्रष्ट झालो असेल तरी राजा अभ्रश्ट पाहिजे असे त्यांची अपेक्षा फोल ठरणार आहे.पुढे, ज्या भांडवलदारांनी याला खतपाणी घातले त्याचे देणे लोकपरतिनिधींनी ना पहिल्यांदा परत फेडावे तर लागणार , नंतरच मतदाराचा कामाचा नंबर लागणार. कारण, जशो प्रजा तथो राजा हे सूत्र आहे. त्यामुळे पुढील तरुण पिढीचे भवितव्य अंधकारमय करण्यास हे भ्रष्ट मतदार जबाबदारी घेतील का ? खरतर ,शाळेतून भ्रष्टाचार हा विषय शिक्षकांनी मुलांना शिकवायला हवा तरच त्यांना स्वच्छ शासन मिळू शकेल.

error: Content is protected !!