इन्सुली सात जांभळी येथे तब्बल 29 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने तब्बल 19 लाखांच्या गोवा बनावटीच्या दारुसह 10 लाखाचा टेम्पो असा एकूण 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एसपी सौरभ अग्रवाल, अतिरिक्त एसपी नितीन बगाटे , एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घाग, हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, गुरुनाथ कोयंडे, नाईक अमित तेली, रवी इंगळे, यशवंत आरमारकर यांनी ही कारवाई 3 मार्च रोजी रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी इन्सुली सात जांभळी येथे सदर कारवाई केली. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गणेश सुभाष पाटील ( वय 45, रा.राठी, देवपूर, धुळे ) याला अटक करण्यात आली आहे.