उंबर्डे उर्दू शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी पॅडचे करण्यात आले वाटप
वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने आज उंबर्डे उर्दू शाळेमध्ये मासिकपाळी व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करत मार्गदर्शन व मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप केले. यावेळी विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल रो.धावले मॅडम, मिस्त्री मॅडम यांनी मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ने या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेची निवड केल्याबद्दल मुख्याध्यापिका मगदूम मॅडम यांनी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे आभार मानले. यावेळी रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये रोटरी क्लब व वैभववाडीचे प्रेसिडेंट संतोष टक्के, सेक्रेटरी संजय रावराणे यांनी मार्गदर्शन केले. रोट. विद्याधर सावंत,रोट विनय धावले, रोटरियन धावले मॅडम, मिस्त्री मॅडम आधी रोटीरियन उपस्थित होते . शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यकश्य अंगणवाडी सेविका व पालक ही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पालकांनीही रोटरी क्लबच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतिक करून यापुढेही या प्रशालेला अशाच प्रकारची मदत करावी अशी विनंती केली. या प्रशालेच्या मुख्याध्यापिका मगदूम मॅडम मुल्ला मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या शाळेतील कामाचे शैक्षणिक उपक्रमांचे रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.