सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मातृसेवा सेवाभावी संस्था, चिंचवड, पुणे, दक्ष फाऊंडेशन, महाराष्ट्र तेजस्विनी सामाजिक, शैक्षणिक विकास संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर लक्षवेध संमेलन, पुणे – २०२३ चं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानही सत्कार सन्मान सोहळ्याच आयोजनही करण्यात आलय.
1. या सोहळ्यात परफेक्ट अकॅडमीचे सर्वेसर्वा, ज्यांच्या माध्यमातून कोकणातील अनेक सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंगची दालने खुली झाली असे प्रा. राजाराम परब यांचा शिक्षणमहर्षी म्हणून सन्मान होणार आहे…
हा कार्यक्रम ५ मार्च २०२३ ला सकाळी ११ वाजता, सायन्स पार्क हॉल, ऑटो क्लस्टर कंपनीसमोर, डी मार्टच्या मागे, चिंचवड स्टेशन, पुणे इथं होणार आहे.
हा सन्मान सोहळा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, समाजसेवक गिरीश प्रभुणे, परफेक्ट अकॅडमीचे संस्थापक प्रा. राजाराम परब यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संगीता शिंदे, सुहास गोडसे, अनिल वेदपाठक आदिची उपस्थिती असणार आहे