सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड-राणेवाडी येथील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज माजी सरपंच लाडोबा केरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यासाठी डोंगरी विकास योजनेअंतर्गत तीन लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, तात्या मुळीक, कविता शेगडे, मधुकर जाधव, ग्राम विस्तार अधिकारी अनंत जाधव, वसंत राणे, विठ्ठल कोरगावकर, सदा परब, शांताराम राणे, नामदेव राणे, सिताराम नाईक, बाळा राणे व राणेवाडीतील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मळेवाड राणेवाडी वस्तीतील डांबरीकरणा करिता तीन लाख रुपये डोंगरी विकास योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली होती. डोंगरी विकास योजनेअंतर्गत डांबरीकरणाचा शुभारंभ माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य व भाजपचे विद्यमान मळेवाड शक्ती केंद्रप्रमुख लाडोबा केरकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी श्री देव ब्राह्मण देवतेला प्रार्थनाही करण्यात आली.