नाधवडे केंद्र शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

सांगुळवाडी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या कृषीदुतांचा सहभाग

वैभववाडी (प्रतिनिधी) : १ जुलै कृषी दिन या उपक्रमांतर्गत सांगुळवाडी येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी नाधवडे येथे वृक्षारोपण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षतोडीचे दुष्परिणाम उपस्थिताना सांगितले. तसेच भविष्यात जंगल संवर्धन ही काळाची गरज बनली आहे वृक्षतोडीच प्रमाण वाढत गेल्यास भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे वृक्ष संवर्धन करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे असे विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. कृषीदुतांनी वृक्षसंवर्धना बाबत उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन सांगुळवाडी उद्यानविद्या महाविद्यालयाचे कृषिदूत रोहन कुलाळ, यश जाधव, योगेश शंदे, कार्तिक अनभूले ,मुकेश बोडके, सुलेमान इनामदार, संकेत बोधगीरे, शुभम लाळगे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. आर. कामतेकर, कार्यक्रम समन्वयक पी. एस. सावंत, सहाय्यक प्रा. एन. आर. फुटणकर यांचे मार्गदर्शन लाभले व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी केंद्र शाळेच्या मुख्याध्यापक एस.व्हि.आलदर, शिक्षक धामापूरकर, कासले आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!