५३८ सार्वजनिक तर ६२३ खाजगी होळ्यांचे होणार पूजन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात होळी उत्सवाला सोमवार(६ मार्च) पासून सुरुवात होत असून जिल्ह्यात ५३८ सार्वजनिक तर ६३३ खाजगी अशा एकूण ११७१ ठिकाणी होळीचे पूजन होणार आहे .काही गावात मान पानावरून वाद असल्याने अशा गावात पोलीस प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, होलिकोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीचा होळी उत्सव ६ मार्च पासून सुरू होत असून काही गावात पाच दिवस, सात दिवस, तर त्यापेक्षाही अधिक दिवस हा होळी उत्सव साजरा केला जातो. या वर्षी जिल्ह्यात ५३८ ठिकाणी सार्वजनिक तर ६३३ ठिकाणी खाजगी अशा एकूण ११७१ ठिकाणी होळीचे सालाबाद प्रमाणे पुजन केले जाणार आहे. काही गावात मानपानावरुन वाद होण्याची शक्यता आहे. अश्या ठिकाणी प्रशासनाने (निर्बंध) बंदी घातली आहे. तसेच ज्या गावात वाद आहेत अश्या गावात वाद मिटविण्याच्या दृष्टीने पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या मार्फत प्रयत्न सुरू आहेत. सोमवार ६ मार्च पासून सुरू होणारा हा उत्सव चांगल्या उत्साही वातावरणात साजरा व्हावा. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये मानपाना वरून वाद आहेत त्यामुळे येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्या गावात होळी उत्सवास तूर्तास निर्बंध घालण्यात आले आहेत. तहसीलदार स्तरावर हे वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू असून त्यातील काही गावांमध्ये वाद मिटण्याची शक्यता आहे. असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावर्षी सिंधुदुर्गात होळी उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होऊ लागले असून यावर्षीचा होळी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे. सिंधुदुर्गात गावागावातील रोंबाट, रंगपंचमी आणि वेगवेगळ्या वेशभूषा तील नाच गाणी येथील वेगळेच आकर्षण असते. त्यामुळे
पोलीस प्रशासनाने होळी उत्सव शांततेत व आनंदी वातावरणात पार पाडण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक होळयामध्ये दोडामार्ग ५२, बांदा २६, सावंतवाडी ४०, वेंगुर्ला २७, निवती १२, कुडाळ ९१, सिंधुदुर्गनगरी ९, मालवण ५९, आचरा २१, कणकवली ६७, देवगड ६७, विजयदुर्ग २५, वैभववाडी ३८, अश्या ५३८ ठिकाणी सार्वजनिक होळीचे पूजन होणारआहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी उत्सवाची धुम सुरु होणार असून बंदी घातलेल्या गावात पोलिस बंदोबस्त तैनात ठेऊन उत्सव शांततेत पार पडण्याचे पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहे.