बापर्डे येथे काथ्यावर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र काथ्या धोरण २०१८ अंतर्गत महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC) मुंबई पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) सिंधुदुर्ग आयोजित मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम बापर्डे येथील ग्रामपंचायत सभागृह बापर्डे येथे जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदूर्गचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलनाने शुभारंभ झाला.

यावेळी बापर्डे गावचे सरपंच संजय लाड, महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्रचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे , ग्रामसेवक शिवराज राठोड, मास्टर ट्रेनर तुषार चव्हाण, संदीप नाईकधुरे, अजित राणे, जिवन नाईकधुरे, ग्रामपंचायत सदस्य सुविधा पुजारे , दिशा वासगे, संतोष नाईकधुरे, गुणवंत राणे, रूपेश मोंडकर तसेच मोठया संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते .
या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदूर्गचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले म्हणाले कि मोफत एक दिवसीय कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या युवक, युवती, महिला, माजी सैनिक, अपंग, बचत गट सदस्य या सर्वांना नारळाच्या सोडण्या पासून काथ्या तयार करून त्यापासून दोरी तयार करणे, मॅटस तयार करणे, पायपुसण्या तयार करणे, विविध फॅशनेबल वस्तूंची निर्मिती करणे बाबतच्या अनेक कुटीरउद्योगाची माहिती व मार्गदर्शन करून त्यावर आधारित काथ्या उद्योग- व्यवसाय त्यांनी सुरु करून स्वावलंबी करून त्यानां आत्मनिर्भर करण्याचा महत्वाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे यांनी कोकण विभाग काथ्या उद्योग व्यवसाय ( coir industry) मधील विवीध उद्योग संधी, महाराष्ट्र कोकण विभाग काथ्या धोरण – २०१८ बद्दलची माहिती या सोबत विविध काथ्या उत्पादनांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे काथ्यावर आधारित कुटीरोद्योग कसा करावा बाबत माहिती तसेच विवीध शासकिय कर्ज योजना व सबसिडी योजनांची माहिती दिली. मोफत एक दिवसीय कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या पात्र युवक- युवतीं करिता पुढे ३० दिवसांचा मोफत “तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे” आयोजन ग्रामपंचायत सभागृह बापर्डे येथे १ महिना कालावधीचा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पं.स देवगड समुह समन्वयक विनायक धुरी तर आभार विजय मेस्त्री यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!