आमदार नितेश राणे ठरले देवदूत !बापार्डे जुवेश्वर गावातील विवाहितेवर हृदय व्हॉल्व ची यशस्वी मोफत शस्त्रक्रिया

आरिफ बगदादी यांची विशेष मेहनत

देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील बापार्डे जुवेश्वर येथील विवाहित महिला अनुजा अनिल घाडी यांच्यावर हृदय व्हॉल्व्ह ची यशस्वी शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष आरिफ बगदादी यांनी विशेष मेहनत घेतली. मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अनुजा घाडी यांच्यावर ही शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात आली. स्वाभिमान ट्रस्ट चे जाईद खान आणि फैनीदा मॅडम यांचे बहुमोल सहकार्य याकामी लागले.अनुजा घाडी यांच्या हृदयाच्या व्हॉल्व ची शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक होते. मात्र कौटुंबिक आर्थिक स्थिती बेताची असलेल्या घाडी याना यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च करणे अशक्य होते. घाडी कुटुंबियांनी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा माजी जि प उपाध्यक्ष आरिफ बगदादी यांची भेट घेत आपबिती कथन केली. लागलीच आरिफ बगदादी यांनी आमदार नितेश राणे यांना घाडी कुटुंबियांवर ओढवलेल्या संकटाची कल्पना दिली. आमदार नितेश राणे यांनी जाईद खान यांच्याशी संपर्क साधण्यास सांगून अनुजा घाडी यांच्या ऑपरेशन ची तयारी करून घेतली. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अनुजा घाडी यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून घाडी कुटुंबियांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!