प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा परिषद समोर बेमुदत साखळी उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : गणित, विज्ञान पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी न दिल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद समोर साखळी उपोषण सुरु केले आहे.जि.प.सिंधुदुर्ग येथे २०१९ मध्ये पवित्र पोर्टल मार्फत ७६ गणित/विज्ञान पदवीधर शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली होती. त्यापैकी ७३ पदवीधर शिक्षकांनी ३ वर्ष समाधानकारकरित्या शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर या शिक्षकांचे नियमित आदेश निर्गमित करतांना चुकीचे पद व वेतनश्रेणी देण्यात आली.या शिक्षकांना नियमित पदवीधर वेतनश्रेणी द्यावी .या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गने आजपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे.

उपसचिव,ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की,२०१९ मध्ये नियुक्त प्राथमिक पदवीधर शिक्षकांना “गणित/विज्ञान प्राथमिक पदवीधर शिक्षक हे पद व वेतनश्रेणी एस-१४” देण्यात यावी.पदवीधर शिक्षकांना त्यांचे पद व वेतनश्रेणी देण्यास जि.प. सिंधुदुर्ग टाळाटाळ करत आहे. असे संघटनेला निदर्शनास आल्याने संघटनेने पुन्हा ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात आला आहे.
२०१९ मध्ये नियुक्त प्राथमिक पदवीधर शिक्षकांना “गणित/विज्ञान प्राथमिक पदवीधर शिक्षक हे पद व वेतनश्रेणी एस-१४” देण्यात यावी. असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे.तरीसुद्धा जि.प.सिंधुदुर्ग ,वरील विषयाकडे दुर्लक्ष करत आहे असे संघटनेला निदर्शनास आल्याने एक दिवसीय धरणे आंदोलन ७ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आलेले होते.

या आंदोलनाची दखल घेत आंदोलनाला प्रत्यक्ष शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी भेट घेतली व संघटनेला आश्वासित केले की गणित/विज्ञान पदवीधर शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध होताच उपरोक्त पदवीधर शिक्षकांना “गणित/विज्ञान प्राथमिक पदवीधर शिक्षक हे पद व वेतनश्रेणी एस-१४” देण्यात येत आहे.त्यामुळे शिक्षणाधिकारी यांच्या शब्दांवर संघटनेने विश्वास दाखवत तात्पुरते आंदोलन स्थगित केले होते. पदवीधर शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणी एस-१४ असलेले सुधारित आदेश निर्गमित होण्यास जि.प.सिंधुदुर्गची उदासिनता दिसून येत आहे .त्यामुळे संघटनेला नाईलाजास्तव तीव्र स्वरूपाचे बेमुदत साखळी उपोषण करावे लागत आहे. असे संघटनेचे म्हणणे आहे.

तर वेतनश्रेणीचे सुधारित आदेश निर्गमित होईपर्यंत तीव्र स्परूपाचे निरंतर बेमुदत साखळी उपोषण सुरूच राहिल .आणि यावेळी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन स्थगित होणार नाही.असा इशारा जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी दिला आहे. या आंदोलनात राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, यांच्यासह सुरेखा कदम, संतोष कुडाळकर, सचिन पवार ,वैभवी कसालकर ,नारायण नाईक ,संतोष राणे, नीलम बांदेकर ,नामदेव जांभवडेकर ,प्रसाद जाधव, संदीप मिराशी आदींसह मोठ्यासंखेने पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!