कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावात गवा रेड्याचा वावर दिसून येत आहे.ग्रामपंचायतच्या पाण्याची टाकी असलेल्या परिसरात 6 मार्च रोजी सायंकाळी ६.४० वाजता हा गवारेडा ग्रामपंचायत कर्मचारी श्री.घाडी यांना दिसून आला. सद्या आंबा काजू हंगाम सुरू असल्यामुळे बागायतदार शेतकरी बागांमध्ये काम करतात. त्यात गवा रेडा दिसल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. याबाबत वन विभागाने तातडीने उपाययोजना करत गवा रेड्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी असलदेतील शेतकऱ्यांनी केली आहे.